Tuesday, August 9, 2016

इन्टरसोलर इंडिया

सौर ऊर्जा क्षेत्रात मानाचे समजले जाणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन.








भारतातील सौर क्षेत्रातील सर्वात मोठे व्यावसायिक प्रदर्शन "इंटरसोलर इंडिया" या वर्षी मुंबई येथे होणार आहे. हे प्रदर्शन १९ ते २१ ऑक्टोबर या काळात आयोजित केले आहे. या प्रदर्शनामध्ये विविध देशातील सौर ऊर्जा संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनासाठी विनामूल्य असून यात आपणास सौर ऊर्जेतील नवीन संशोधन आणि त्यांचे फायदे यांची माहिती मिळू शकेल.

अधिक माहितीसाठी भेट द्या
इंटरसोलर इंडिया संकेतस्थळ इथे क्लिक करा

सौर मार्ग

आता रस्ते उजळतील सौर उर्जेने



सौर रस्ते / मार्ग हे सौर ऊर्जेतील सर्वात महत्वाचे संशोधन आहे. या संशोधनाद्वारे आता वाहतुकीसाठी वापरले जाणारे रस्ते ऊर्जानिर्मितीतही सहभाग घेतील. या तंत्राद्वारे सौर ऊर्जेचा वापर करून रात्री हेच रस्ते दिशादर्शकाचे काम करतील तसे पथदीप उजळवून अंधारामुळे होणाऱ्या अपघातांत कमी करू शकतात. तसेच यामुळे अधिक वीजनिर्मिती होऊन वीजबचत होणार आहे.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

सौर विमान

जगातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे विमान 'सोलर इम्पल्स'.  


'सोलर इम्पल्स' हे जगातील पहिले सौर उर्जेवर चालणारे विमान ठरले आहे. मानवाने या शोधामुळे सौर ऊर्जेच्या दिशेने उड्डाण केले आहे. या विमानाने आत्तापर्यंत ४०,००० किमी प्रवास केला आहे. नुकतेच सोलर इम्पल्सने जगभ्रमंतीदेखील पूर्ण केली आहे. 'सोलर इम्पल्स' या विमानामध्ये सौर उर्जेव्यतिरिक्त इतर कुठल्याही इंधनाचा वापर केलेला नाही. 

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

सोलर पेंट

आता उजळणार सौर ऊर्जेवरील रंगाने घर.



सोलर पेंट हि एक पर्यावरणपूरक सोलर सेल टेक्नॉलॉजी आहे. या तंत्राचा वापर आपण घराच्या भिंतीवर करू शकतो. यामधील सोलर सेल पॉलिमर पासून बनविलेले असतात. सध्या या  टेक्नॉलॉजीचा प्रयोग घराच्या छतावर करण्यात येत आहे. फारच थोड्या काळात आपल्याला या पेंटचा वापर आपल्या घरांच्या भिंतीवर करता येईल.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा