कर्नाटक मधील बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियम हे जगातील पहिले सौर उर्जेवर चालणारे स्टेडियम ठरले आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने पुढाकार घेऊन या स्टेडियमच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविला आहे. या प्रकल्पाची क्षमता ४०० किलो वॅट इतकी आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून या प्रकल्पाद्वारे दरवर्षी ५.९० लाख युनिट वीजनिर्मिती होत आहे. त्याचबरोबर हा प्रकल्प दरवर्षी सुमारे ६०० टन कार्बन डायॉक्साईड वायूचे निसर्गातील उत्सर्जन कमी करत आहे.

