सौरऊर्जेविषयी

सूर्य हा आपल्या आकाशगंगेतला सर्वात मोठे तारा आहे. आपल्या पृथ्वीच्या उत्पतिमागचे रहस्यदेखील सूर्य आहे. सूर्य संपूर्ण विश्वाला केवळ प्रकाश देण्याचे नाही तर संपूर्ण जीवसृष्टी चालवण्याचे काम करत आहे. आपल्या अनेक धर्मग्रंथांमधे सूर्याला देवतेचे स्थान देऊन त्याचे महत्व अधोरेखित केले आहे. अशा या सूर्यापासून आपल्याला अनेक प्रकारे ऊर्जा प्राप्त होत असते. सौर ऊर्जा ही प्रामुख्याने उष्णता अणि प्रकाश या दोन प्रकारांमधे विभागली गेली आहे. यातील उष्णतेचा वापर करून आपण अनेक पदार्थं गरम करू शकतो. उष्णतेशिवाय पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात राहू शकत नाही. सूर्याच्या प्रकाशकिरणांचा पृथ्वीवरील अनेक जीवांना विविध प्रकारे फायदा होतो. त्याचबरोबर सौर पीव्ही सिस्टिमचा वापर करून आपण या प्रकाशकिरणांपासून वीज निर्माण करू शकतो. चला सौर ऊर्जेच्या दिशेने एक पाऊल टाकूया.