निसर्गाचा लहरीपणा आणि शेतमालाच्या भावातील अनिश्चता यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जेच्या संकल्पनेवर आधारित 'सौर शेती' हा पर्याय अतिशय उपयोगी ठरत आहे. सौर शेती या प्रकल्पात आपल्या जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतो. भारत सरकारने जाहीर केलेल्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर मिशन' अंतर्गत असे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास सरकार प्राधान्य देत आहे. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण निसर्गाचे संवर्धन देखील करत असतो. १ युनिट सौर ऊर्जा निर्मितीपासून आपण १ किलो कार्बन आणि ३.५ लिटर पाणी वाचवतो. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कार्बन वायूवर बंधन आणण्यासाठी अनेक राष्ट्रांनी संमत केलेल्या 'क्योटो प्रोटोकॉल ' नुसार अशा प्रकल्पांना 'क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिसम (सी.डी.एम.) अंतर्गत सहकार्य करण्यात येते. चला तर मग या माध्यमातून आपण आपल्या नवीन पिढीसाठी स्वच्छ आणि सुंदर भविष्य निर्माण करूया.

