सौर विमान

सोलर इम्पल्स

उड्डाण सौर ऊर्जेकडे

जगातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे विमान 'सोलर इम्पल्स'.

अधिक जाणून घ्या
अपारंपरिक ऊर्जा

स्वच्छ आणि अमर्यादित ऊर्जा

निसर्गाची मानवाला लाभलेली मोठी देणगी म्हणजे सौर ऊर्जा. सौर ऊर्जा ही स्वच्छ आणि प्रदूषणविरहित आहे. सौर ऊर्जा आपल्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

अधिक जाणून घ्या
सौर शेती

पाण्याविनाही शेती

आता शक्य आहे

आता करा आधुनिक पद्धतीने सौर शेती. सौर ऊर्जेचा वापर करून आपल्या शेतातून ऊर्जानिर्मिती करा.

अधिक जाणून घ्या
ग्लोबल वॉर्मिंग

पर्यावरणाचे असंतुलन

सौरऊर्जेकडे आहे सोल्युशन

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या विळख्यातून बाहेर पाडण्यासाठी सौर ऊर्जेचा पर्याय

अधिक जाणून घ्या

चला पर्यावरणाचे संरक्षण करूया, सौर ऊर्जा वापरुया

  • स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जा

  • अपारंपरिक आणि अमर्यादित ऊर्जा

  • ३ ते ४ वर्षांमध्ये गुंतवणुकीचा परतावा

  • २५ वर्षे आयुमर्यादा

  • आवाजविरहित ऊर्जा निर्मिती

सौर जगत

Thursday, August 25, 2016

सोलर सेल



सौर उर्जेपासून विदयुत ऊर्जा निर्माण करण्यासाठी सोलर सेलचा वापर होतो. सोलर सेल प्रामुख्याने सिलिकॉन धातूचे बनविलेले असतात. सोलर सेलला फोटोव्होल्टाइक सेल (पीव्ही सेल) असेही म्हणतात. या सोलर सेलचे प्रमुख तीन प्रकार असतात.
१. मोनो क्रिस्टलाईन
२. पॉली क्रिस्टलाईन आणि
३. अमॉर्फोस सेल
सूर्यकिरणांपासून विदयुत ऊर्जा निर्माण करण्याचे काम सोलर सेल करतात. सौर ऊर्जेपासून मिळणारी ऊर्जा सोलर सेल च्या कार्यक्षमतेवर अवलंबून आहे सोलर सेलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी संशोधन मोठ्या प्रमाणावर चालू आहे. सध्या उपलब्ध असलेल्या सोलर सेलची कार्यक्षमता १६ ते १८ टक्के इतकी आहे.

Wednesday, August 24, 2016

अक्षय पात्र



'अक्षय पात्र फॉउंडेशन' ही भारतातील बेंगळूर येथे स्थापन झालेली एनजीओ आहे, या संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजसेवी उपक्रम राबवले जातात. उपासमार आणि कुपोषण या महत्वाच्या समस्यांवर ही संस्था काम करत आहे. सरकारी शाळांमध्ये या संस्थेने माध्यान्न भोजन योजना सुरु केली. तसेच या योजनेत आता सौर ऊर्जेचाही वापर केला जातो. या प्रक्रियेसाठी सौर पॅरॅबोलिक पॅनलचा वापर केला जातो. याद्वारे पाण्याचे वाफेत रूपांतर करून अन्न शिजवले जाते.

संदर्भ : https://www.akshayapatra.org/

Sunday, August 21, 2016

राष्ट्रीय सौर ऊर्जा कार स्पर्धा



डायनॅमिस्ट मोटरस्पोर्ट्स या संस्थेतर्फे आयोजीत 'राष्ट्रीय सौर ऊर्जा कार स्पर्धा २०१६-२०१७' घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत सौर उर्जेवर चालणारी एका माणसाकरिता 'सौर कार' बनवायची आहे. स्पर्धेचा उद्देश सौर ऊर्जेबाबतीत प्रबोधन करणे आणि 'हरित ऊर्जेचे' महत्व पटवून देण्याचा आहे. या स्पर्धेद्वारे प्रधानमंत्री द्वारा पुरस्कृत 'मेक इन इंडिया' या उपक्रमालासुद्धा प्राधान्य मिळाले आहे. या स्पर्धेची अधिक माहित आणि अटी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

Thursday, August 18, 2016

भारतातील पहिली सौर उर्जेवर चालणारी रेल्वे



भारतीय रेल्वेने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. नुकतेच भारतीय रेल्वेच्या उत्तर पश्चिम विभागाने सौर उर्जेवर चालणाऱ्या प्रवासी रेल्वेची चाचणी घेतली. हि चाचणी रेल्वेच्या जोधपूर विभागात घेण्यात आली. या सौर उर्जेवर चालणाऱ्या रेल्वेमुळे मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या इंधनाची बचत होणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे अनेक टन कार्बन वायूच्या उत्सर्जनात घाट होणार आहे.  

Tuesday, August 16, 2016

जगातील पहिले सौर उर्जेवर चालणारे स्टेडियम

कर्नाटक मधील बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियम हे जगातील पहिले सौर उर्जेवर चालणारे स्टेडियम ठरले आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने पुढाकार घेऊन या स्टेडियमच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविला आहे. या प्रकल्पाची क्षमता ४०० किलो वॅट इतकी आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून या प्रकल्पाद्वारे दरवर्षी ५.९० लाख युनिट वीजनिर्मिती होत आहे. त्याचबरोबर हा प्रकल्प दरवर्षी सुमारे  ६०० टन कार्बन डायॉक्साईड वायूचे निसर्गातील उत्सर्जन कमी करत आहे.

Sunday, August 14, 2016

बेअरफूट कॉलेज



बेअरफूट कॉलेज, हे सामाजिक कार्य आणि संशोधन केंद्र उत्तर-पश्चिम भारतातील वाळवंटी प्रदेशामध्ये टीलोनिया, राजस्थान येथे वसलेलं आहे. 'बेअरफूट कॉलेज' हे ग्रामीण समूहाच्या जीवनावश्यक गरजा आणि त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी ग्रामीण समुदाय, विशेषतः अत्यंत गरीब वर्गाला सक्षम शिक्षण कार्यक्रम उपलब्ध करून देत आहे. ग्रामीण भागातल्या महिलांना सौर ऊर्जेचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवणारी संस्था असा नावलौकिक बेअरफूट कॉलेजने मिळवला आहे. 'बेअरफूट कॉलेज' हि एक सामाजिक विषयांवर काम करणारी समाजसेवी संस्था आहे.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

Saturday, August 13, 2016

सौर ऊर्जा संशोधन संस्था

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर ऊर्जा मिशन अंतर्गत 'राष्ट्रीय सौर ऊर्जा संशोधन आणि शिक्षण संस्था' आय.आय. टी. मुंबई येथे स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेत सौर ऊर्जा क्षेत्रात संशोधन करण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली आहे. या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.