सोलर इम्पल्स

'सोलर इम्पल्स' हे जगातील पहिले सौर उर्जेवर चालणारे विमान ठरले आहे. या शोधामुळे सौर ऊर्जेच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल जगाने टाकले आहे. या विमानाने आत्तापर्यंत ४०,००० किमी प्रवास केला आहे. नुकतेच सोलर इम्पल्सने जगभ्रमंतीदेखील पूर्ण केली आहे. 'सोलर इम्पल्स' या विमानामध्ये सौर उर्जेव्यतिरिक्त इतर कुठल्याही इंधनाचा वापर केलेला नाही. गेली अनेक वर्षे आपण सौर ऊर्जा आणि त्यातील नवीन संशोधन यात होणारे बदल बघत आहोत. भविष्यात इंधनविरहित प्रवासही आता शक्य होऊ शकतो हेच या सौर विमानाच्या उड्डाणाने आपणास दिसून येत आहे. 'सोलर इम्पल्स' या विमानाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.